Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेतोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेल्यांना काय बोलणार

तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्मलेल्यांना काय बोलणार

आदित्यचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख – मुख्यमंत्री

मुंबई : आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.

पाठीवर वार करणाऱ्यांनी समोर येत लढावे, मी एकटा तुमच्याविरोधात लढण्यासाठी तयार आहे, हे राज्य छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, तर माझ्या नादाला लागलात तर तुमचे नाव विसरायला भाग पाडेल. एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, अशी वल्गना आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यात काढलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या सभेत केली होती.

यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायचा अधिकार आहे. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचे कोणाला पाडायचे. मला त्यावर बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, शिवसेना उभी करण्यात माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. घरादारावर तुळशी पत्रक ठेवले. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आले आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या, त्यांच्यावर मी काय बोलणार? असा सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -