Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३

Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३

मानसन्मानाचे योग
मेष: एकंदरीत हा आठवडा शुभ फळे देईल. काहींना मानसन्मानाचे योग आहेत. शुभ ग्रहमानामुळे आजूबाजूला सकारात्मक घटना घडतील. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात काही मान्यवरांच्या ओळखी होतील. नवे परिचय होतील, ते आपल्यासाठी भविष्यात उपयुक्त सिद्ध होतील. तसेच समाजातील मान्यवरांच्या व मोठ्या लोकांच्या सहवासात राहावयास मिळेल. त्यांचे मार्गदर्शन लाभेल. वेळप्रसंगी मदतही मिळेल. आपले विचार सकारात्मक राहतील, त्यामुळे आपल्या हातून सकारात्मक कृतीही घडेल. कुटुंब परिवार, विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहविषयी बोलणे प्रगतिपथावर असतील. काहींचे परिचयोत्तर विवाह ठरतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सोडून त्यांच्या प्रगतिपर बातम्या कानावर येतील. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक असेल.
मंगलकार्य घडेल
वृषभ:
व्यवसाय-धंद्यात परिस्थिती उत्तम राहून उलाढाल वाढेल. व्यवसायातील नव्या संकल्पनांचा केलेला वापर फलद्रूप ठरेल. नवीन तंत्रज्ञानही वापरू शकाल. व्यावसायिक नवीन करारमदार होऊ शकतात. कुटुंब, परिवारातील तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील. गाठीभेटीतून विवाहासारख्या गोष्टी ठरतील. मंगलकार्य घडेल. ओळखीतून विवाह प्रस्ताव येऊ शकतात. काही फायद्याचे सौदी हाती येतील. गेल्या काही दिवसांत व्यवसायात आलेली मरगळ जाऊन नवजीवन प्राप्त होईल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची घडी नीट बसवू शकाल. व्यवसाय-धंद्यातील जुनी नाती नव्याने प्रस्थापित होतील. जे जातक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
समाधानकारक परिस्थिती राहील
मिथुन: व्यवसाय-धंद्यात-नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहील. त्यामुळे आर्थिक चणचण पूर्वीसारखी जाणवणार नाही. कामगारांचे सहकार्य लाभेल. नोकरीविषयक दिलेल्या जुन्या मुलाखती यशस्वी झालेल्या दिसून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. त्याचप्रमाणे चालू नोकरी बदलून चांगले पॅकेजची दुसरी नोकरी शोधण्यात प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. ओळखींचा उपयोग होऊ शकतो. चालू नोकरीत पदोन्नती व वेतन वृद्धीही मिळण्याची शक्यता आहे. मात्र बदलीची तयारी ठेवावी लागेल. कुटुंब परिवारात शुभकार्य घडेल. ओळखीतून विवाह प्रस्ताव येतील. प्रेमप्रकरणे विवाहासारख्या पवित्र बंधनात परावर्तित होतील. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे राहील.
प्रयत्नांना निश्चितच यश
कर्क:
आपली आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्याने स्वतःच्या घराचे स्वप्न फलद्रूप होऊ शकेल. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्या प्रयत्नांना निश्चितच यश प्राप्त होईल. पैशाची सोय होईल. राहत्या घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वृद्धी होईल. गृहसौख्य मिळून कुटुंबातील मुला-मुलींकडून मनास आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील. तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. नोकरीविषयक कामे होतील. आपले जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करू शकाल. प्रलंबित राहिलेली सरकारी कामे पूर्ण करता येतील. नोकरीमध्ये अनुकूल वातावरण लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. मानसन्मान मिळेल.
धनलाभाचे योग
सिंह: सर्वंकष यश मिळेल. नोकरीमध्ये आपण आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. वेतनवृद्धी, पदोन्नतीसारख्या घटना घटित होतील. वरिष्ठांबरोबरील संबंध अधिक दृढ होतील. मात्र आपल्या कामात आपण अद्यावत राहणे गरजेचे आहे. साहित्यक्षेत्रातील जातक व बुद्धिजीवी वर्गातील जातक यांना प्रसिद्धीसह धनलाभाचे योग आहेत. सहपरिवार प्रवासाचा आनंद घेऊ शकाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील. इतरांवर शेरेबाजी टाळा. मनात असलेली एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. कुटुंब, परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.
कामे गतिशील होतील
कन्या:
दीर्घकालीन प्रलंबित असलेली कोर्ट कचेरीतील कामे गतिशील होतील. दावे जे दाखल केले होते, त्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल. सुटकेचा निश्वास सोडाल. जमीन-जुमला स्थायी संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद शमून सर्वमान्य तोडगा निघेल. या कामात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा सहभाग असू शकतो. कुटुंब-परिवारात वातावरण उत्तम राहून आपल्याला कुटुंबातील इतर सदस्यांचे सहकार्य लाभेल. विशेषतः जीवनसाथीचे सहकार्य सर्व बाबतीत आपल्याला लाभलेले दिसून येईल. मुलांकडून चांगल्या वार्ता मिळतील.
तणावमुक्त वातावरणाचा लाभ
तूळ : बदलत्या ग्रहमानानुसार आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील फरक आपल्याला जाणवेल. तोपर्यंत जी कामे बऱ्याच प्रयत्नांनी होत नव्हती, ती आता साध्या प्रयत्नांनी झाल्याने आश्चर्यचकित व्हाल. तरुणांना त्यांच्या उपक्रमातून यश मिळेल. विशिष्ट चिंता मिटतील. ताण-तणावमुक्त वातावरणाचा लाभ मिळेल. घरामधील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबात शुभ कार्य घडेल. प्रेमात यश संपादन करता येईल. मात्र जरा जपून राहणे हितकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात मोठे फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता आहे. नवीन करारमदार होतील. सरकारी कामे मिळतील. विद्यार्थ्यांचे परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल.
प्रयत्न चालू ठेवा

वृश्चिक: आजपर्यंत जी प्राप्त परिस्थिती आहे, ती परिस्थिती सांभाळून ठेवा. विशेषतः नवीन नोकरी बदलण्याच्या भानगडीत न पडता आहे ती नोकरी प्रामाणिकपणे व शिस्तबद्ध रीतीने चालू ठेवा. नोकरीतील परिस्थिती थोड्या काळानंतर बदलेल. नोकरी सोडणे अतिशय धाडसाचे ठरेल. नाही त्या मोहात पडू नका. व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहून उलाढाल वाढलेली दिसेल. नफा वाढून उत्पन्नात वृद्धी होईल. व्यवसाय विस्तारासाठी विचार करू शकाल. स्वतःच्या घराविषयीचे प्रयत्न चालू ठेवा, यश मिळेल. महत्त्वाची कामे होतील.

दिलासा मिळेल
धनु: सदरच्या कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूस अशा काही घटना घडतील की, आपले रोजचे जीवन मान बदलून जाईल. अर्थातच या घटना सकारात्मकच असतील. दीर्घकालीन रखडलेली कामे आपण जी पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करून सुद्धा ती होत नव्हती. अशा प्रकारची कामे पूर्ण होतील, त्यामुळे दिलासा मिळेल. परमेश्वराचे आभार माना. रखडलेले जमिनीविषयक व्यवहार गतिशील होतील. त्यातून आर्थिक फायदा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून भरघोस आर्थिक फायदा मिळेल. कौटुंबिक आघाडीवर खूश असाल.
प्रेमात यश लाभेल
मकर:
शुभ ग्रहमानामुळे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रातून नवनवीन संधींचा लाभ मिळू शकेल; परंतु त्या संधीचे सोने करणे आपल्याच हातात आहे हे नीट लक्षात ठेवणे जरूरी आहे. कुटुंबामध्ये विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. प्रेमात यश लाभेल. व्यवसाय-धंद्यात काही नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे. नवीन भागीदारीसाठी विचारणा होऊ शकते. व्यवसाय विस्ताराच्या कल्पना आपल्या फलद्रूप होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे जरुरी आहे तसेच सरकारी योजनांचा फायदाही मिळू शकेल. फक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित करावे तसेच कुसंगती व व्यसने यांच्यापासून अलिप्त राहण्यात हित आहे, हे लक्षात ठेवावे. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील.
आनंदात भर पडेल
कुंभ:
नोकरी-व्यवसाय-धंद्यात अनुकूल घटना घडल्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. आपण ज्या गोष्टींची वाट बघत होता त्या आता फलद्रूप होत असताना बघून उत्साह वाटेल. आपल्या पुढील कामे आपण वेगाने कराल. आपण घेतलेले निर्णय बरोबर होते, हे पाहून आपल्या उत्साहात भर पडेल. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून हा विचार करू शकाल तसेच नोकरीमध्ये अनुकूल वातावरण लाभेल. ज्यांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळेल. रोजगाराचा प्रश्न सुटेल. आत्मविश्वासाने आपण इतरांशी बोलून आपली कामे करून घ्याल. प्रवासाचे योग आहेत. कुटुंब-परिवारातील वातावरण चांगले राहील. कौटुंबिक समस्या आपल्या पुढाकाराने आपण सोडवाल. त्यामुळे आपल्या मतास प्राधान्य, मान मिळेल.
मानसिकता सकारात्मक राहील
मीन: आर्थिक स्थिती चांगली राहून मानसिकता सकारात्मक राहील. व्यवसायिक जुनी येणी वसूल करताना थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. पण वादविवाद आणि भांडणे टाळा तसेच अनावश्यक खर्चाला कात्री लावा. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील. सहकुटुंब देवदर्शनासाठी प्रवास घडू शकतो. त्यात जरी बराच खर्च झाला तरी मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे समाधानी राहाल. परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाहातील अडचणी दूर होतील. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. व्यवसाय-धंद्यामध्ये भरभराट होईल. चालू नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती राहील.

Recent Posts

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

40 mins ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

2 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

3 hours ago

Blast: फटाका कंपनीत भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू ३ जखमी

शिवकाशी: तामिळनाडूच्या शिवकाशीमद्ये गुरूवारी एका फटाका कंपनीत(fireworks factory) भीषण स्फोट झाला. यात पाच महिलांसह ८…

3 hours ago

Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा!

हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यात यलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई…

4 hours ago