Share

साप्ताहिक राशिभविष्य, दि. २८ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर २०२२

प्रवासकार्य सिद्ध होतील
मेष – हा सप्ताह आपणासाठी अतिशय चांगला आहे. कामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्या पार करून आपण आपली कार्यसिद्धी करणार आहात. आपल्यातील उत्साहाने आपली कामे सहजतेने व शांततेत होतील. या कालावधीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये धाडसाचे निर्णय घ्याल. अनपेक्षितपणे चांगल्या घटना घडू लागणार आहेत. आपल्या घरामध्ये कौटुंबिक कार्यक्रम होऊ शकतात. आरामदायी वस्तूंवर व थोडा चैनीवर खर्च होणार आहे. खर्चावर आपले लक्ष असू द्यावे. आपल्या आरोग्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
कष्टाचे चीज होईल
वृषभ – शुभ ग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. आजूबाजूच्या माणसांना तुमचे महत्त्व कळणार आहे. आपल्या बुद्धिचातुर्याने व कार्यकुशलतेने आपली दीर्घकाळ रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश मिळेल. समाजातील मान्यवर व सन्माननीय व्यक्तीमुळे आपण आपली कार्ये पूर्ण करू शकाल. मानसन्मान वाढेल. आपण घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. तुम्ही आनंदी असणार आहात. आपल्या कल्पना खूप चांगल्या असल्याने लोक त्याची प्रशंसा करतील व त्या कार्यान्वित होतील. काही अशुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे व्यावसायिक भागीदारीमध्ये समस्या उद्भवतील.
आर्थिक स्थैर्य लाभेल
मिथुन – आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने पूर्ण करू शकाल. जमीन-जुमला, स्थावर मालमत्ता याविषयीची कामे मार्गी लागतील. ओळखी, मध्यस्ती यशस्वी होतील. आपले विचारही सकारात्मक असणार आहेत. आपले कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न होतील. परदेशातूनही चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थैर्याचा कालावधी आहे. या काळात आपल्या इच्छा पूर्ण होतील.
यश आणि समृद्धीचा काळ
कर्क – या सप्ताहात यशाचा आणि समृद्धीचा काळ असणार आहे. आपला कल्पक दृष्टिकोण आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी सुसंवाद राहणार आहे. आपल्या कार्यकुशलतेनेमुळे वरिष्ठ आणि सहकारी यांचे आपणास सहकार्य लाभणार आहे. यामुळे आपली प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. परदेशगमनाचे योग आहेत. मात्र या कालावधीमध्ये घराकडे फार दुर्लक्ष करू नका. अधिक काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा कुटुंबामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नुकसान संभवते.
आत्मविश्वास वाढेल
सिंह – या सप्ताहामध्ये तुम्ही पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक काम करणार आहात. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. मुक्तहस्ते खर्च कराल. आपण कोणतेही काम धाडसाने करणार आहात. आपण मोठी झेप घेणार आहात. पूर्वीचे नियोजन सफल होईल. व्यवसाय धंद्यामध्ये काही नवीन करार-मदार होतील. काही फायद्याचे सौदे हाती येतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल.
व्यावसायिक प्रगती होईल
कन्या – आपण फार आक्रमक होऊ नका. आपल्या हट्टाला नियंत्रण ठेवा तसेच क्रोध आवरा. आपल्या कार्यक्षेत्रात इतर कोणाचाही अपमान करू नका. त्याचप्रमाणे कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. वाद-विवाद टाळा. वाद-विवाद होतील अशा प्रसंगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा ते हिताचे ठरेल. अन्यथा आपण अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद-भांडणे होण्याची शक्यता आहे. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. हा सप्ताह आपणास मिश्र स्वरूपाचा जाणार आहे.
कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल
तूळ – वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती करणार आहात. आपल्या कारकिर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबीयांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावे. यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. आपल्या व्यापार-व्यवसायात कार्यक्षेत्रामध्ये कौशल्याने आणि बारकाईने लक्ष देणे फार आवश्यक आहे.
नशिबाची साथ लाभेल
वृश्चिक – स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित चांगले बदल घडणार आहेत. हे बदल लाभकारी असणार आहेत. थोड्याच प्रयत्नांनी आपल्या समोरील कामे आपण पूर्ण करू शकाल. काही महत्त्वाची कामे सहजी झाल्याने आपल्याला आश्चर्य वाटू शकते. नशीब आपल्याबरोबर आहे. याची खात्री पटेल. परमेश्वराचे आभार माना. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. सहकाऱ्यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
नवीन आव्हाने स्वीकारा
धनु – आपला नेहमी दृष्टिकोन सकारात्मक असतो. या सप्ताहातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालणार आहे. आपल्या राशीचा चांगला कालखंड आहे. गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ आहे. मात्र नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणाच्या गोड बोलण्याला अथवा जाहिरातबाजीला फसू नका. आपल्याला जवळच्या सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. काही नवीन आव्हाने पुढे उभी राहतील ती स्वीकारा.
आर्थिक लाभ मिळेल
मकर – या सप्ताहात नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे नक्कीच चांगले. नातेसंबंधात वादविवाद होण्याची शक्यता आहे. आपण सकारात्मक राहिला तर कामाचे आणि समाजाशी संबंधित तुमची तत्त्वे व्यक्त करताना तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमच्या कल्पना तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता. त्यामुळे आर्थिक आवक वाढणार आहे. काही घटना मनाविरुद्ध घडल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. मात्र अपेक्षा भंगामुळे चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणतेही निर्णय घेताना शांतचित्ताने व पूर्ण विचारांती घ्या. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. वादविवाद टाळा. इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देणे हितकारक ठरू शकते.
सकारात्मकता ठेवा
कुंभ – आपण आपल्या नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवणारे आहात. या सप्ताहात आपल्याला नशिबाची साथ कमी मिळेल. आपल्या कार्यात कार्यमग्न राहून प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निराश न होता कार्य चालू ठेवा. उद्योग व्यवसायात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अति आत्मविश्वास फारसा चांगला नाही. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवे प्रकल्प करणे टाळा. या कालावधीमध्ये सकारात्मक असणे फार गरजेचे आहे. तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे.
ताणतणावापासून सुटका
मीन – आपल्याला या सप्ताहामध्ये ताणतणावापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामाची पूर्तता होण्यासाठी आपले काही प्रयत्न केले होते, त्याचे फळ आता आपल्याला मिळणार आहे. ताणतणावापासून मुक्तता मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे. मात्र या कालावधीमध्ये आपला स्वभाव थोडा आक्रमक बनण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्तरावर तुमची प्रगती होणार आहे. आपणास प्रभावशाली व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर प्रगती होईल.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

18 mins ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

3 hours ago

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

4 hours ago

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

4 hours ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

5 hours ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

8 hours ago