Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४

Share

साप्ताहिक राशिभविष्य, २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४

भाग्याची चांगली साथ मिळेल
मेष :
या सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत, याची काळजी घ्या. जास्त परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो, संयम ठेवा. भाग्याची चांगली साथ मिळेल. कार्यव्याप्ती वाढल्यामुळे कामाचा ताण जाणवू शकतो. त्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. दगदग होईल. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन बदल होऊ शकतात ते अनुकूल ठरतील. त्याचबरोबर काही अतिरिक्त महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. कामानिमित्त लहान-मोठ्या प्रवासाचे योग येतील. प्रवासकार्य सिद्ध राहतील. कामामुळे थोडा तणाव राहू शकतो. कौटुंबिक परिस्थिती समाधानकारक राहील.
प्रश्न संपुष्टात येतील
वृषभ :
आपल्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची शक्यता राहील. कामाचा थोडा ताण जाणवू शकतो. मात्र त्यातून फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवा. व्यवसाय-धंद्यामधील नियोजन यशस्वी झाल्यामुळे कामाचे प्रमाण वाढेल. मदतीची आवश्यकता भासेल. मदत उपलब्ध होईल. नवीन तंत्रज्ञान, नवीन संकल्पना यांचा यशस्वी वापर व्यवसायात होईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात थोडी दगदग होऊ शकते. भावंडांशी सर्वसामान्य संबंध राहतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना राहून समन्वय राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल.
अंदाज बरोबर ठरतील
मिथुन :
व्यवसायामधली परिस्थिती बदलून आपले पूर्वीचे नियोजन प्रत्यक्षात उतरत असल्याचे बघून समाधान वाटेल. आपले अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे व्यवसाय-धंद्यामध्ये लाभ होईल. व्यवसायाची पद्धत बदलता येईल. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. प्रत्यक्षात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज लागेल. डॉक्टरांच्या गाठीभेटी होतील. त्यांना आपण मदत करू शकाल. कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. कुटुंबातील वादविवाद मिटवण्यात आपला पुढाकार राहील. सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. आर्थिक परिस्थिती बळकट राहील. यामुळे खर्चाकडे विशेष लक्ष राहणार नाही. पैशाच्या प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
नवीन करार-मदार होतील
कर्क :
व्यवसाय-धंद्यामध्ये तसेच नोकरीतही चांगल्या संधी मिळतील. त्यातून आर्थिक फायदा मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती-वेतनवृद्धीसारख्या घटना घडू शकतात. मात्र बदलीची शक्यता. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. व्यवसाय-धंद्यात एखादा चांगला फायद्याचा सौदा हाती येऊ शकतो. नवीन करार-मदार होतील. उलाढाल वाढेल.नवीन व्यवसायिक नाती निर्माण होतील. भागीदारी व्यवसायात भागीदाराचे मत लक्षात घेतल्यामुळे फायद्यात राहाल. कुटुंबात भावंडांशी सख्य राहील. जीवनसाथीबरोबर मधुर संबंध राहतील. मुलांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक कराल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल; परंतु फसवणूक टाळा.
उत्साह वाढेल
सिंह :
आपल्या सभोवताली वातावरण अनुकूल राहील. थोड्याच प्रयत्नांनी आपली दैनंदिन कामे सहज होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. कुटुंबातील सदस्यांचे तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून सहाय्य मिळेल. आरोग्य चांगले राहून उत्साह वाढेल. सरकारी स्वरूपाची कामे होतील. जमीन-जुमला या विषयीची थांबलेली कामे गतिमान होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कार्यरत होईल. आर्थिक फायदा होऊ शकतो. आपल्याला थोडे समजुतीने घ्यायला पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रात नियोजन महत्त्वाचे ठरेल. योजनांसह आपले प्रयत्नसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. सामाजिक मानसन्मान मिळतील.
परदेशगमनाचे नियोजन
कन्या :
नोकरीमध्ये बदल घडू शकतात. नवीन नोकरी मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. चालू नोकरीमध्ये बदलीची शक्यता तसेच कामाच्या स्वरूपातही बदल होऊ शकतो. कधी कधी मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतात, हे लक्षात ठेवा. पण नाराज न होता कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. इतरांना दोष देऊ नका. कामाविषयीचे आपले ज्ञान अद्ययावत ठेवा तसेच नियम व शिस्त पाळा. व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. कामगार वर्गाचे सहकार्य लाभेल. मुलांच्या प्रगतीपर बातम्या कानावर येतील. आर्थिक आवक राहील.
आश्चर्यजनक घटना
तूळ
:
या सप्ताहात नोकरीविषयक काही आश्चर्यजनक घटना घडतील. नोकरीमध्ये आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पदोन्नती, वेतनवृद्धी होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये आपण केलेल्या कामगिरीचे कौतुक होईल. बक्षीस मिळेल. इतरांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. काहींना परदेशगमनाचे योग. कलाकार, खेळाडू यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. सहकुटुंब, प्रवासाचे नियोजन करू शकाल. धार्मिक स्थळी भेट द्याल. प्रवास चांगला होईल. भागीदारी व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता. भागीदाराचे मत समजून घ्या.
यश संपादित करू शकाल

वृश्चिक : नोकरी-धंद्यात तसेच व्यवसायात आपले वर्चस्व वाढेल. आपण घेतलेले निर्णय अचूक आणि बरोबर ठरल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होईल. आपले अनुकरण इतर करतील. आपल्या कार्यशैलीचा प्रभाव इतरांवर पडेल. नोकरीत पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. वरिष्ठांशी संबंध सुधारतील तसेच हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील. आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. ओळखी, मध्यस्थी यशस्वी होतील. बरेच दिवस रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील.

गुप्त चिंता संपुष्टात येईल
धनु : मागील काही दिवस आपल्या मनावर आलेले ताण अथवा एखादी गुप्त चिंता संपुष्टात येईल. अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयीची कामे करताना वाद होण्याची शक्यता. शांत राहण्याची गरज. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या कामात उपयोगी पडू शकतो. व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत अनुकूलता वाढेल. सहकारी, वरिष्ठांशी संबंध सुधारतील. पदोन्नती किंवा वेतनवृद्धी मिळेल. अधिकार वाढतील. सरकारी नोकरीत मानसन्मान मिळू शकतो.
आर्थिक स्थिती समाधानकारक राहील
मकर :
या सप्ताहात आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अनुकूल वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. यामुळे खर्चही मनाप्रमाणे करू शकाल. मात्र मनात थोडे काळजीचे विचार असतील. कुटुंबातील मुला-मुलींना यश मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल. सहपरिवार मित्रमंडळींसमवेत एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. पूजापाठात मन रमेल. त्यामुळे एखादी चांगली अनुभूती येऊ शकते. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. खाणे-पिणे सांभाळा. पथ्य पाळा. नोकरीत राजकारण आणि गटबाजीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. आपण स्वतः शांत राहा. कुटुंब-परिवारात एखादे मंगलकार्य ठरू शकेल.

रागावर नियंत्रण हवे
कुंभ :
या कालावधीमध्ये आपल्याला अनेकानेक मार्गांनी लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. संयम व प्रयत्न आवश्यक आहेत. कुटुंब, परिवार तसेच आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या रागावर नियंत्रण हवे. रागाच्या भरात इतरांचा अपमान करू नका. इतरांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. आनंदी राहण्याचा मनाचा स्थायीभाव बनवा. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील तसेच उसने दिलेले पैसे परत मिळतील; परंतु अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे ठरेल. काहींना प्रवास करावे लागतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या यशाच्या बातम्या कानावर येतील. कुटुंब व घरासाठी मुक्तहस्ते खर्च कराल.
शत्रूंवर विजय

मीन : आर्थिक आलेख उंचावत राहील. नोकरीत पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकेल. स्पर्धकांवर विजय मिळवाल. तसेच शत्रू व हितशत्रूंवर विजय संपादित करता येईल; परंतु नको त्या मार्गाचा अवलंब करू नका. उत्पन्नात भरघोस वाढ होईल तसेच जुन्या गुंतवणुका फलद्रूप होतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल. तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील. आर्थिक आवक चांगली राहील. यामुळे व्यवसायामध्ये बदल करू शकाल. व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल. सरकारी कायदे-कानून पाहणे हिताचे ठरेल. मुलांची प्रगती होईल. कुटुंबामध्ये एखादा धार्मिक समारंभ घडेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.

Tags: horoscope

Recent Posts

SRH vs LSG: हैदराबादचा धमाकेदार विजय, लखनऊला १० विकेटनी हरवले

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…

2 hours ago

उच्च न्यायालयाच्या इमारतीचे तत्काळ सेफ्टी ऑडिट करा

सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…

3 hours ago

Weight loss: वजन घटवायचे आहे तर रात्री खाऊ नका हे ५ पदार्थ

मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…

3 hours ago

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा शिरकाव

६ रुग्ण गंभीर; एकाचा मृत्यू मच्छर चावल्याने पसरतो आजार बंगळूरु : केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने…

4 hours ago

कुठून आली IPLची ही ट्यून? १७ वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर करतेय राज्य

मुंबई: भारतात सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामाची धूम आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळवण्यात आला…

4 hours ago

दिल्लीतील रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह ९ जणांना अटक, रुग्णांकडून लाच घेतल्याच्या आरोपानंतर कारवाई

नवी दिल्ली: सीबीआयने मोठी कारवाई करताना दिल्लीच्या RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने रुग्णालयाच्या…

5 hours ago