भारतात वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाचं सावट असणार? 'या' गोष्टी आवर्जून टाळा

खगोलप्रेमींसाठी २०२६ हे वर्ष अत्यंत खास ठरणार असून २०२६ चे पहिले सूर्यग्रहण काही तासांवर येऊन ठेपलंय.

 पंचांगानुसार, मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे सूर्यग्रहण पार पडणार आहे. 

खगोलशास्त्रीय माहितीनुसार, हे ग्रहण दुपारी ३:२६ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ७:५७ पर्यंत राहील. 

सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका, आफ्रिकेचा काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागरावर दिसेल. 

हे ग्रहण माघ अमावस्येच्या दिवशी होणार असून ते कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे.

या काळात आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकतं. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं महत्वाचं आहे.

ग्रहण काळात आपण काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे ग्रहण काळात काय करावे अन् काय करु नये, जाणून घ्या.

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी सूर्य मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप शुभ मानला जातो.

 तसेच, ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करणं फायदेशीर असतं.

या काळात स्वयंपाक आणि कोणत्याही पदार्थांचं सेवन टाळा.

गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घेणं गरजेचं असून तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं.