होळीला पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो?

होळी हा वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा उत्सव

महाराष्ट्रमध्ये होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी बनवण्याची परंपरा आहे.

होळीच्या काळात हरभरा आणि गव्हाचे नवीन पीक येते. या नवीन धान्याचा वापर करून पुरणपोळी बनवण्याची प्रथा आहे

हरभऱ्याची चणाडाळ, गूळ आणि  वेलची यांचा सुगंध सणाचा माहोल अधिक गोड बनवतो

होलिका दहनानंतर गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.

होळीच्या दिवशी सर्वजण एकत्र बसून पुरणपोळीचा आस्वाद घेतात आणि नात्यांमध्ये गोडवा वाढवतात.

हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात शिवाय गूळ आरोग्यासाठी  फायदेशीर मानला जातो