हिवाळ्यात केस  जास्त का गळतात?

 हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे  टाळू कोरडी पडते, त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात.

घाम कमी येत असल्याने  नैसर्गिक तेलांचा अभाव निर्माण  होतो आणि ओलावा कमी होतो

वारंवार गरम पाण्याने आंघोळ  केल्याने नैसर्गिक तेल निघून जाते त्यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करावी 

थंड हवामानामुळे टाळूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो,  त्यामुळेही केसगळती होते. 

हिवाळ्यात पाणी कमी पिणे  व असंतुलित आहार याचा  परिणाम केसांवर होतो.

टोपी, स्कार्फच्या वापराने  केस झाकले गेल्याने घर्षण वाढते  व केस तुटतात.

थंडीमुळे कोंडा वाढतो,  त्यामुळे केस गळती वाढते.

ऋतू बदलाचा परिणाम शरीरावर होऊन केस गळती होऊ शकते.