संक्रांतीपासून दिवस मोठे आणि रात्र लहान का होते ?

संक्रांतीनंतर दिवस मोठे, रात्र लहान होण्यामागे शास्त्रीय कारण आहे.

पृथ्वी आपल्या अक्षावर  सुमारे 23.5 अंश तिरकी आहे.

वर्षभर पृथ्वी सूर्याभोवती  फिरताना सूर्यकिरण पृथ्वीवर  वेगवेगळ्या प्रकारे पडतात.

मकरसंक्रांतीच्या सुमारास सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो आणि  उत्तरायण सुरू होते.

सूर्य हळूहळू उत्तर  गोलार्धाकडे सरकतो. 

त्यामुळे उत्तर गोलार्धात  सूर्यकिरणांचा कालावधी वाढतो.

दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात.

रात्रींचा कालावधी कमी होऊ लागतो.

मकरसंक्रांतीला प्रकाश, उर्जा आणि सकारात्मकतेचा सण म्हणतात.