आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे  टॉप 10  गोलंदाज कोण ?

1.भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात सर्वात कमी धावा दिल्या आहेत. त्याने आरसीबीसाठी खेळताना ९ सामन्यांत १५.५३ च्या सरासरीने सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या आहेत.

2.अंशुल कंबोज

अंशुल कंबोजने २०२६ हंगामात चेन्नईकडून पदार्पण करत १० सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या.

3.कगिसो रबाडा

गुजरातच्या कगिसो रबाडाने यंदाच्या हंगामात १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या आहेत.

4.जोफ्रा आर्चर

जोफ्रा आर्चरने १० सामन्यांत राजस्थानसाठी १५ विकेट्स घेतल्या आहेत.

5.ईशान मलिंगा

हैदराबादच्या ईशान मलिंगाने दहा सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या आहेत.

6.प्रिन्स यादव

प्रिन्स यादवने शानदार पदार्पण केले. त्याने पहिल्याच हंगामात ९ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.

7.एएम घझनफर

मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या एएम घझनफरने या हंगामात ८ सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत.

8.प्रसिद्ध कृष्णा

प्रसिद्ध कृष्णाने गुजरातसाठी खेळताना फक्त ७ सामन्यांत  १२ विकेट्स घेतल्या आहेत.

9.मोहम्मद सिराज

यंदाच्या हंगामात मोहम्मद सिराजने सर्वाधिक १०९ डॉट बॉल टाकले आहे. त्याने १० सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या

10.राशिद खान 

आयापीएल २०२६ मध्ये राशिद खानने गुजरातसाठी १० सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत