शंकराची विविध नावं आणि त्यामागचा इतिहास

महादेव   देवांचा देव

सृष्टीच्या चक्रावर नियंत्रण ठेवणारे आदिदेव म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो

नीलकंठ   विष पिणारा रक्षक

समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहल विषाचे प्राशन केल्यामुळे शिवांचा कंठ निळा झाला

भोलेनाथ  निरागस आणि कृपाळू

शिव लवकर प्रसन्न होतात, भक्तांच्या भावनेला महत्त्व देतात, म्हणून त्यांना ‘भोलेनाथ’ म्हटले जाते

पशुपतिनाथ   सर्व जीवांचे नाथ

या रूपात शिव सर्व सजीवांचे रक्षण करतात.नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिर हे त्यांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे

त्र्यंबकेश्वर   तीन नेत्रांचा स्वामी

त्र्यंबकेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते

नटराज  सृष्टीचा नर्तक

‘नटराज’ म्हणजे नृत्याचा राजा. शिवाचे तांडव नृत्य सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहाराचे प्रतीक आहे

अर्धनारीश्वर  शिव-शक्तीचे अद्वैत रूप

या नावामागील तत्त्वज्ञान म्हणजे पुरुष आणि स्त्री ऊर्जा एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत