महाशिवरात्रीला 'या' चुका करणे टाळा 

आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री आली की वातावरणात एक वेगळीच श्रद्धा जाणवू लागते.

 खऱ्या मनाने केलेली शिवभक्ती आयुष्यातल्या अडचणी कमी करते, पण अनेकदा श्रद्धेच्या ओघात आपल्याकडून काही छोट्या चुका होतात.

महाशिवरात्रीला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

या दिवशी कोणाशी भांडण करणं, अपशब्द बोलणं किंवा मनात कटुता ठेवणं योग्य मानलं जात नाही.

 जर कोणाशी मतभेद झाले तरी प्रयत्न करा की दिवस संपण्यापूर्वी मन साफ होईल. हीच खरी पूजा आहे.

भक्तीमध्ये भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण परंपरेची माहिती असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.

अनेकदा लोक नकळत शिवलिंगावर हळद किंवा सिंदूर वाहतात, जे योग्य मानलं जात नाही.

शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल, दूध, दही, मध, बेलपत्र, धतरा, भांग आणि पांढरी फुलं अर्पण केली जातात.

Click Here

Learn more