'या' कारणामुळे असतो लिपस्टिकवर नंबर

प्रत्येक मुलीच्या मेकपमधला महत्वाचा भाग म्हणजे लिपस्टिक याशिवाय कोणताच लूक पूर्ण होत नाही

नियमित वापरासाठी मुलींचे काही आवडते शेड्स असतात तर एखाद्या विशेष दिवसासाठी मुली लूकनुसार लिपस्टिकची निवड करतात 

सध्या लिपस्टिकचे वेगवगळे टेक्शचर आणि कलर कॉम्बिनेशन्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत

अनेक लिपस्टिकवर किंवा बॉट्लच्यामागे बऱ्याचदा आकडे असतात

हा आकडा लिपस्टिकची शेड दर्शवतो, जे विशिष्ट रंग किंवा फॉर्म्युलेशन दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात

लिपस्टिकची विशेष शेड तुम्ही वापरली आणि तुम्हाला आवडली तर या नंबरमुळे त्या शेडची लिपस्टिक सहज मिळण्यास मदत होते

ऑनलाइन शॉपिंगमध्ये हे नंबर्स फायद्याचे ठरतात यामुळे  हवी ती लिपस्टिक मिळते

एकच नाव अनेक ब्रँड्सद्वारे वापरलं जाऊ नये म्हणून लिपस्टिकवर कोडसोबत एखादे विशेष नावही लिहिलेलं असतं