उन्हाळ्यात थंडावा देणारे
'कोकम सरबत'
असे तयार करा
उन्हाळ्यात शरीराला थंडावा
देण्यासाठी कोकम सरबत हा उत्तम
पर्याय आहे. चवदार आणि आरोग्यदायी पेय घरच्या घरी सहज तयार करा!
कोकम शरीराला थंड ठेवते आणि डिहायड्रेशनपासून बचाव करते.
लागणारे साहित्य
सुकं कोकम – 8-10 तुकडे, साखर –
4-5 चमचे, जिरे पावडर – ½ चमचा,
काळं मीठ – चिमूटभर, पाणी – 1 ग्लास
सुकं कोकम 1-2 तास पाण्यात
भिजत ठेवा. यामुळे त्याचा रंग आणि
चव व्यवस्थित पाण्यात उतरते.
भिजलेलं कोकम हाताने मॅश करून त्याचा अर्क काढा. नंतर ते गाळून घ्या.
अर्कात साखर, जिरे पावडर आणि
काळं मीठ घाला. चांगलं मिक्स करा.
सरबत ग्लासमध्ये ओता, बर्फाचे
तुकडे घाला आणि थंडगार सर्व्ह करा.
अधिक चविष्ट बनवण्यासाठी पुदिन्याची पानं किंवा लिंबू रसही घालू शकता.
घरी बनवलेलं कोकम सरबत हे
केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा!