उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी सब्जा हा एक उत्तम  नैसर्गिक पर्याय मानला जातो.

सरबत, दूध किंवा पाण्यात  भिजवून खाल्ल्यास याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

सब्जा बी भिजवल्यानंतर जेलसारखे होते, जे शरीराचे तापमान कमी ठेवून उष्णतेपासून संरक्षण मिळते.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सब्जा उपयोगी ठरतो. 

 अॅसिडिटी, जळजळ  कमी करण्यासाठी सब्जा खूप फायदेशीर आहे. थंड पेयांमध्ये टाकून घेतल्यास आराम मिळतो.

सब्जा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते.

सब्जामध्ये फायबर भरपूर असल्याने पचनक्रिया सुधारते 

उन्हाळ्यात वाढणारी शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्याचे काम सब्जा करतो.

शरीर थंड ठेवल्यामुळे त्वचेवर  होणारे पुरळ, घामोळे यापासूनही काही प्रमाणात संरक्षण मिळते.