साऊथची सुपरहिट जोडी अखेर विवाहबंधनात

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अखेर 26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाहबंधनात अडकले.

यापूर्वी ही जोडी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या सिनेमात झळकली होती. 

राजस्थानमधील उदयपूर येथे आयटीसी मेमेंटोमध्ये भव्य लग्नसोहळा संपन्न झाला. 

सकाळी पारंपरिक तेलगू पद्धतीने संध्याकाळी रश्मिकाच्या कोडवा रितीरिवाजांनुसार विवाह पार पडला

फक्त कुटुंबीय आणि अगदी जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. 

लाल रंगाची साडी, सोन्याचे हार, बाजूबंद, कमरपट्टा आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेली रश्मिका.

धोतर आणि लाल शेला तसेच पारंपरिक दागिने विजयने  परिधान केले होते. 

इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर होताच चाहत्यांनी अनेक शुभाशीर्वाद दिले. 

अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आणि  दीर्घकाळ चर्चेत असलेल्या जोडीचा विवाह संपन्न झाला. 

हे लग्न ग्लॅमरपासून दूर, शांत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.