सलमान खान –
चाहत्यांचा भाईजान
नुकताच सलमानने त्याचा ६० वा वाढदिवस साजरा केला.
सर्वांचा लाडका 'प्रेम' आजवर
३० वर्षांहून अधिक काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय.
चला तर मग जाणून घेऊयात
त्याच्या गाजलेल्या सिनेमांविषयी
मैंने प्यार किया (1989)
या चित्रपटाने सलमान खान
रातोरात सुपरस्टार झाला आणि
प्रेमकथांचा काळ सुरु झाला.
हम आपके हैं कौन (1994)
भारतीय लग्न विधी, परंपरा, गाणी
यामुळे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या
मनाला भुरळ पाडतो.
करण अर्जुन (1995)
पुनर्जन्माची कथा, भावनिक क्षण आणि जबरदस्त संवाद. ज्यातील “मेरे करण अर्जुन आएंगे” अजरामर ठरलं.
जुडवा (1997)
डबल रोल, कॉमेडी आणि फुल ऑन एंटरटेनमेंट, त्या काळातील
सुपरहिट सिनेमांपैकी एक.
तेरे नाम (2003)
सलमानच्या करिअरमधील सर्वात भावनिक भूमिका, ज्यातील हेअरस्टाइल आजही चाहत्यांना आवडते.
वॉन्टेड (2009)
या सिनेमाने सलमानचा दमदार
कमबॅक होऊन अॅक्शन स्टारची
नवी ओळख निर्माण झाली.
दबंग (2010)
चुलबूल पांडेने बॉक्स ऑफिसवर
धुमाकूळ घातला, हा सिनेमा स्टाईल,
डायलॉग स्वॅगचा परफेक्ट पॅकेज आहे.
बजरंगी भाईजान (2015)
सीमा, धर्म यापलीकडे
जाणारी माणुसकीची कथा,
सलमानचा सर्वात हृदयस्पर्शी सिनेमा.
सलमान खान - भाईजान
चित्रपट हिट्स, फ्लॉप्स,
अनेक वाद… तरीही क्रेझ कायम.
Click Here