पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताय? भेट द्या 'या' ७  किल्ल्यांना! 

दुर्गराज राजगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी! पावसाळ्यात हा किल्ला हिरवागार होतो. येथील संजीवनी आणि सुवेळा माचीवरून दिसणारा view डोळे सुखावणारा असतो.

किल्ले रायगड : शिवछत्रपतींचे समाधी स्थळ आणि मराठा साम्राज्याची राजधानी. पावसाळ्यात रायगडावर जाणे म्हणजे ढगांमध्ये फिरण्याचा अनुभव घेणे होय. ट्रेक नको असल्यास येथे 'रोपवे'ची सोयही आहे

 किल्ले सिंहगड : पुण्याजवळ असलेला हा किल्ला पावसाळ्यात पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतो. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची भूमी असलेला हा किल्ला धुक्यात हरवून जातो.

हरिश्चंद्रगड : ट्रेकर्सचा स्वर्ग! येथील 'कोकणकडा' पावसाळ्यात अंगावर शहारे आणणारा ठरतो. तसेच तारामती शिखर आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर पावसाळ्यात खूप सुंदर दिसते.

किल्ले लोहगड : लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला नवशिक्या ट्रेकर्ससाठी अगदी योग्य आहे. पावसाळ्यात या किल्ल्याच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असते, ज्यामुळे चढाई करताना एक वेगळाच आनंद मिळतो.

किल्ले तोरणा : छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला! पावसाळ्यात या किल्ल्याचे सौंदर्य 'प्रचंड' वाढते. ढगांच्या दुलईत लपलेला हा किल्ला ट्रेकर्सना विशेष आकर्षित करतो.

 किल्ले विसापूर : लोहगडाच्या शेजारी असलेला हा किल्ला पावसाळ्यात एका वेगळ्याच रूपात येतो. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांवरून जणू जिवंत धबधबा वाहत असतो, ज्यातून ट्रेकिंग करण्याचा अनुभव थरारक असतो.