जाणून घ्या टेडी बिअरच्या जन्माची कहाणी

व्हॅलेंटाईन वीकचा ४  था दिवस म्हणजे टेडी डे

या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात

मुलींना लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी जास्त आवडतात

या टेडीबिअरची निर्मिती अमेरिकेतून झाली

अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट यांनी एका जखमी अस्वलाला गोळी मारण्याचे आदेश दिले

त्या जखमी अस्वलाला त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांनी तो आदेश दिला

ही घटना सर्व अमेरिकेत वाऱ्यासारखी पसरली

व्यंगचित्रकार बेरीमन यांनी या घटनेचे व्यंगचित्र बनवले

टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम यांनी या व्यंगचित्रापासून एक खेळणं बनवलं

आणि त्या खेळण्याला अध्यक्ष रुझवेल्ट यांचं नाव दिलं

रुझवेल्ट यांचं टोपण नाव 'टेडी' होतं

त्यावरून या अस्वलाचं नाव टेडी बिअर पडलं