जाणून घ्या घरच्या घरी  मलई कुल्फी कशी बनवायची?

उन्हाळ्याच्या कडक उन्हात थंडगार मलई कुल्फी खाण्याची मजा काही औरच!

आता हीच कुल्फी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

साहित्य 1 लिटर फुल-फॅट दूध 1/2 कप साखर 1/2  कप मलाई (क्रीम) 4-5 वेलची (पावडर)  10-12 बदाम-पिस्ता (कापलेले) केशर 

गॅसवर दूध ठेवून ते मंद आचेवर सतत हलवत अर्ध होईपर्यंत उकळा. यामुळे कुल्फीला घट्टपणा येतो उत्कृष्ट चवही येते.

आता त्यात साखर, वेलची पावडर आणि केशर घाला. चांगलं मिसळून 5 मिनिटे उकळू द्या.

गॅस बंद करून त्यात मलई आणि बारीक केलेले बदाम-पिस्ता घाला. मिश्रण थोडं थंड होऊ द्या.

हे मिश्रण कुल्फीच्या साच्यात किंवा छोट्या ग्लासमध्ये ओता.

6-8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. पूर्ण सेट होईपर्यंत वाट पाहा.

तयार झालेली कुल्फी बाहेर काढा, साचा हलकासा गरम पाण्यात ठेवून कुल्फी बाहेर काढा आणि थंडगार सर्व्ह करा.