उन्हाळ्यात गुळापासून बनवलेल्या सरबताचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
आयुर्वेदात गुळाला अमृत मानले जाते. कारण यामध्ये नैसर्गिक गोडव्याचा एक समृद्ध स्रोत असून साखरेपेक्षा कितीतरी चांगला पर्याय आहे.
गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
उन्हाळ्यात जेव्हा लोकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, तेव्हा गूळाचा सरबत प्यावा. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि रक्तक्षय दूर करण्यास मदत होते.
गूळाच्या सेवनाने पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतडे स्वच्छ राहतात.
उन्हाळ्यात पाण्यात किंवा ताकात गूळ मिक्स करून प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो.
तहान भागते आणि डिहायड्रेशन टळते. तसेच यामुळे पोटातील गॅस, आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी होते.
आयुर्वेदानुसार गुळातील नैसर्गिक खनिजे शरीराचे तापमान राखण्यास मदत करतात.
ज्यामुळे उष्णतेतही अशक्तपणा जाणवत नाही. गुळाच्या सेवनाने ग्लुकोजदेखील मिळते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात.
गुळाचा सरबत मात्र त्यांची भरपाई करतो आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि थकवा कमी होण्यासही मदत होते.
Click Here