अहमदाबादच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमवर सव्वा लाख चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघाचा दणदणीत विजय
टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरले.
फलंदाजांनी आपले काम योग्यरित्या पूर्ण केले होते. त्यामुळे सर्व जबाबदारी गोलंदाजांवर होती.
बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा खर्च करून ४ गडी बाद केले.
भारताचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने इतिहास घडवला आहे.
संजू सॅमसन व अभिषेक शर्माच्या जोडीने २४ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली.
यापूर्वी, २००७ ते २०२४ पर्यंत, कोणत्याही सलामी जोडीने अंतिम सामन्यात पन्नासपेक्षा जास्त सलामीची भागीदारी केली नव्हती.
अंतिम सामन्यात फलंदाजी करताना अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
यासह आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.
संजू सॅमसन हा यंदाच्या वर्ल्डकपच्या पावरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज. त्याने पावरप्लेमध्ये १० हून अधिक षटकार मारले आहेत.
अक्षर पटेल हा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा खरा अनसंग हिरो ठरला. त्याने न्यूझीलंडला लागोपाठ धक्के दिले.
टी-२० क्रिकेटमध्ये शिवम दुबेची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद २६ धावांची खेळी केली.
Click Here
Learn more