एक महिना चहा बंद केला तर शरीरात होतील हे बदल..

कॅफिनची सवय कमी होते सुरुवातीचे काही दिवस डोकेदुखी व आळस जाणवू शकतो, पण नंतर शरीर नैसर्गिक ऊर्जा तयार करू लागते.

झोपेची गुणवत्ता सुधारते चहा बंद केल्याने झोप लवकर येते आणि खोल झोप मिळते.

पोटाच्या तक्रारी कमी होतात ॲसिडिटी, गॅस व जळजळ कमी होण्यास मदत होते.

ताणतणावात घट होते कॅफिन कमी झाल्याने नर्व्हस सिस्टम शांत राहते, चिडचिड कमी होते.

पाणी पिण्याची सवय वाढते चहाऐवजी पाणी, कोमट पाणी किंवा हर्बल ड्रिंक्स घेण्याकडे कल वाढतो.

त्वचा अधिक ताजीतवानी दिसते डिहायड्रेशन कमी झाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

भूक आणि पचन सुधारते नैसर्गिक भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते.

टीप - चहा बंद करताना ग्रीन टी, हर्बल टी किंवा कोमट पाणी हा चांगला पर्याय ठरू शकतो.