कशी करावी भगवान शिवाची उपासना ?

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना केली जाते

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा उत्सव साजरा केला जातो

पुराणांनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला

भक्त रात्रभर ‘ॐ नमः शिवाय’ चा मंत्रजप आणि भजन-कीर्तन करतात

या दिवशी उपवास ठेवून शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध, धतूरा अर्पण केले जाते

शिवलिंगावर ‘पंचामृत अभिषेक’ केला जातो

महाशिवरात्रीला १२ ज्योतिर्लिंगाला भक्तांची मोठी गर्दी असते

महाशिवरात्री ही ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत शक्तिशाली रात्र मानली जाते

या दिवशी केलेली प्रार्थना आणि जप विशेष फलदायी ठरते