मार्गशीष महिन्यातील गुरूवारी घट कसा मांडावा ?

हिंदु धार्मिक विधींप्रमाणे मार्गशीष महिन्यातील दर गुरूवारी घट मांडला जातो

महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहो यासाठी घट मांडण्याची पद्धत आहे

घट मांडताना पूजा कशी करावी याबद्दल जाणून घेऊया

घट मांडण्यासाठी एक निश्चित जागा निवडा आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा

निवडलेल्या जागेवर सुंदर रांगोळी काढून चौरंग ठेवा

चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर थोडे तांदूळ पसरवून मुख्य पूजेला सुरुवात करा

एका तांब्याच्या किंवा मातीच्या घटात स्वच्छ आणि ताजे पाणी भरा

यामध्ये नाणे, सुपारी, हळद, कुंकू, दूर्वा आणि फुले घालून घटाच्या मुखाजवळ पाच पानं आणि त्यावर उभ्या स्थितीत नारळ ठेवा

तयार केलेला घट चौरंगावर मध्यभागी ठेवून शेजारी लक्ष्मीचा फोटो ठेवावा

यानंतर षोडशोपचारे पूजा करून धूप, दीप, नैवेद्य आणि आरती करावी. तसेच महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी