ओरिजनल खजूर आणि बनावट खजूर कसे ओळखायचे?
खजूर खरेदी करताना आणि खाताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच बनावट खजूर ओळखण्यास मदत होईल.
शुद्ध खजूर खरेदी करण्याच्या टिप्स, जाणून घेऊयात.
जेव्हा ओरिजनल खजूर पाण्यात टाकले जातात, तेव्हा त्याचा रंग किंवा आकार बदलत नाहीत.
याउलट, बनावट खजूर पाण्यात टाकताच त्यांचा रंग फिकट होऊ लागतो.
खरे खजूर बाहेरून कमी गोड आणि आतून जास्त गोड असतात.
तथापि, बनावट खजूर साखर किंवा गुळाच्या पाकात बाहेरून जास्त गोड तर आतून कमी गोड असतात.
खऱ्या खजूरांना ताजा आणि नैसर्गिकरित्या गोड वास असतो.
तर बनावट खजूरांना अनेकदा रंग, पाक आणि रसायनांचा वास असतो.
Click Here