बाजारातील चांगले आणि वाईट आंबे कसे ओळखावे?

सुगंधावरून ओळखा

 आंब्याला नैसर्गिक गोड सुगंध येतो. वास अजिबात येत नसेल किंवा केमिकलचा वास येत असेल तर तो आंबा टाळा.

रंग पाहा

पिकलेला आंबा पिवळा, केशरी किंवा हलका हिरवट-पिवळा दिसतो.  खूपच डाग किंवा काळपट भाग  असल्यास तो खराब असू शकतो.

हलके दाबून पाहा

आंबा हलके दाबल्यावर मऊ वाटला तर तो पिकलेला असतो. खूप कडक  असेल तर कच्चा आणि खूप मऊ  असेल तर जास्त पिकलेला असतो.

साल गुळगुळीत असावी

आंब्याची साल गुळगुळीत आणि ताजी दिसते. खूप सुरकुत्या किंवा सुकलेली साल असल्यास आंबा जुना असू शकतो.

काळे डाग तपासा

सालावर मोठे काळे डाग किंवा कुजलेले ठिपके असतील तर आंबा आतून खराब असण्याची शक्यता असते.

देठाजवळील भाग पाहा

देठाजवळ गोड वास येत असेल तर आंबा पिकलेला असतो. कुजलेले किंवा ओले डाग असतील तर तो खराब असू शकतो.

खूप चमकदार रंग टाळा

खूपच चमकदार पिवळा रंग असलेले  आंबे केमिकलने पिकवलेले असू शकतात.

वजनाचा फरक 

चांगला आंबा वजनाने जड असतो,  हलका लागत असेल तर तो केमिकलने बनलेला असतो.