गोड आणि रसाळ कलिंगड कसे निवडायचे?

वजन तपासा

• आकाराच्या मानाने जड वाटणारे कलिंगड घ्या • जड कलिंगड जास्त रसाळ आणि पिकलेले असते

पिवळा डाग 

कलिंगडावर पिवळसर डाग दिसला तर ते चांगले हा डाग जमिनीवर पडून पिकल्याचे लक्षण असते

ठोठावून पाहा

हलके ठोठावल्यावर खोल आवाज आला तर कलिंगड पिकलेले असते बोथट आवाज आला तर ते कच्चे असू शकते

सालीचा रंग पाहा

गडद हिरवा आणि थोडा मॅट रंग असलेले कलिंगड घ्या खूप चमकदार सालीचे कलिंगड कच्चे असू शकते

आकार समान असावा

समसमान आणि गोल/ओव्हल आकाराचे कलिंगड निवडा विचित्र आकार असलेले कलिंगड कधी कधी नीट पिकलेले नसते

साखरेचे जाळे

सालीवर जाळ्यासारख्या रेषा दिसल्या तर ते जास्त गोड असते मधमाशांच्या परागीकरणामुळे हे दिसते

देठ तपासा

कोरडा देठ असलेले कलिंगड घ्या हिरवा देठ म्हणजे ते पूर्ण पिकलेले नसू शकते

या सोप्या टिप्स लक्षात ठेऊन नेहमी गोड आणि रसाळ कलिंगड निवडा