गरोदरपणात चिकन खावे का?

गरोदरपणात चिकन खावे का?

गर्भवती महिलेच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांचा समावेश गरजेचा असतो. पण, गर्भवती महिलेने चिकन खावे की नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. तर गरोदरपणात चिकन खाणे सुरक्षित आहे की नाही? जाणून घेऊया.

गर्भवती महिलांसाठी चिकन हे एक सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न आहे, परंतु ते योग्यरित्या खाणे खूप महत्वाचे आहे.

 आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की चिकन हे लीन प्रथिनांचे उच्च-गुणवत्तेचे स्रोत आहे, जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. 

चिकनमध्ये चरबीचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे गरोदरपणात वजन नियंत्रित करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ते एक स्मार्ट पर्याय बनते. 

त्यात जीवनसत्त्वे आणि सेलेनियम सारखे पोषक घटक असतात, जे आई आणि बाळ दोघांनाही निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मात्र, गरोदरपणात चिकन खाताना ते चांगले शिजवलेलेच खावे. कारण चिकनमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. जे गर्भधारणेदरम्यान विशेषतः धोकादायक असते.

अस्वच्छ पद्धतीने तयार केलेले चिकन, प्रक्रिया केलेले चिकन गरोदरपणात अजिबात खाऊ नये.

चिकन हे पौष्टिक जरी असले तरी ते पोटाच्या आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नाही. त्यमुळे गर्भधारणेदरम्यान आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.