विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार ११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. 

आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून सगळेच पालक प्रयत्नशील असतात.

आता राज्यभरात ११वीची  प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. 

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. २८ मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील.

प्रवेश प्रक्रियेची तारीख

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in या लिंकवर जाऊन फॉर्म भरू शकता.

अधिकृत लिंक 

दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीचा दाखला (आवश्यक असल्यास) दुर्बल घटकातून अर्ज करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला

६ कागदपत्रे अनिवार्य

११वीचे वर्ग ऑगस्ट महिन्याच्या ११ तारखेपासून सुरू होणार आहेत.

या तारखेपासून वर्ग सुरु

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवततेनुसार राबवली जाईल.

अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालयांना या प्रवेश प्रक्रियेत सामील होता येणार.