उन्हाळ्यात अशी 'घ्या' त्वचेची काळजी

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेट होते. त्वचा ताजी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे

घरातून बाहेर पडताना SPF असलेले सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

कॉटन कपडे घातल्याने घाम  कमी येतो आणि त्वचेवर रॅशेस होण्याची शक्यता कमी होते.

उन्हाळ्यात घाम व धूळ त्वचेवर साचते. दिवसातून 2–3 वेळा हलक्या फेसवॉशने चेहरा धुवा.

कलिंगड, काकडी, ताक, नारळपाणी यांसारख्या पदार्थांच्या सेवनाने त्वचेत ओलावा राहतो. 

उन्हाळ्यात जास्त मेकअप केल्यास त्वचेचे पोर्स बंद होतात आणि पिंपल्स येण्याची शक्यता वाढते.

चंदन, गुलाबपाणी किंवा  दही-बेसन यांसारखे नैसर्गिक फेसपॅक त्वचेला थंडावा देतात.

कडक उन्हात बाहेर जाताना टोपी, स्कार्फ, सनग्लासेस वापरल्याने  त्वचा आणि डोळ्यांचे संरक्षण होते