अशी करा प्रभू रामांची पूजा महत्व आणि नियम जाणून घ्या
हिंदू धर्मात चैत्र शुद्ध नवमी अर्थात 'राम नवमी' या दिवसाला फार महत्त्व
यंदा २६ मार्च २०२६ रोजी सर्वत्र राम नवमी साजरा करण्यात येणार
राम नवमीला उपवास करण्याबरोबर मनोभावे पूजा करणं, रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं अत्यंत शुभ
रामनवमीचा उपवास करणाऱ्यांनी या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि मन शांत ठेवावं, वाईट विचार टाळावेत
सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर चौरंगावर श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा
तांब्याच्या भांड्यात पाणी, फुले, अक्षता अर्पण करावेत त्यानंतर दीप,अगरबत्ती प्रज्वलित करून पूजा करावी
या दिवशी रामरक्षा पठण करणं महत्वाचं मानलं जातं
तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या उजवा हात पाण्यावर ठेवा श्रद्धेनं रामरक्षा स्तोत्र म्हणा त्यानंतर पाणी प्या किंवा घरात शिंपडा
मनोभावे पूजा केल्यानंतर दुपारी 12 वाजता घंटानाद करावा यानंतर आरती करावी आणि
प्रभू श्रीरामांचा जप करावा.
Click Here
Click Here