उत्तम आरोग्यासाठी रोज खा 'ही' भरपूर प्रोटीन असलेली डाळ

शरीराची झीज भरून काढण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळींचे सेवन करावे

आपल्या आहारात या ५ डाळींचा समावेश केल्याने अशक्तपणा दूर होण्यास मदत होते

कुळीथ यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्ताची कमतरचा भरून निघते

हाडांना दणकट करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उडीद डाळ खाणे फायदेशीर

मसूर डाळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनी मसूर डाळीचे सूप प्यायला हवे

आपली पचनशक्ती कमकुवत असेल तर मूग डाळ हा चांगला पर्याय आहे. ही डाळ सर्वात कमी वेळात पचते.

तूर डाळीमध्ये फॉलिक अॅसिड आणि मॅग्नेशियम असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि गरोदर महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.