देशाच्या 'या' भागात अशी साजरी केली जाते होळी  

बरसाना  लाठमार होळी

येथे महिलांकडून पुरुषांना काठ्यांनी खेळकर मार देत होळी खेळली जाते

ही होळी राधा–कृष्णाच्या परंपरेशी जोडलेली आहे

वृंदावन   फुलांची होळी

फुलांची उधळण करत होळी साजरी केली जाते

बांके बिहारी मंदिर येथे ही परंपरा विशेष प्रसिद्ध आहे

आनंदपूर साहिब   होला मोहल्ला

होळीच्या दुसऱ्या दिवशी होला मोहल्ला साजरा होतो

निहंग सैनिकांची शौर्यकला आणि मर्दानी खेळ हे याचे वैशिष्ट्य आहे

पश्चिम बंगाल   डोल यात्रा

पश्चिम बंगाल मध्ये होळीला डोल यात्रा म्हणतात

मणिपूर   याओसांग

मणिपूर मध्ये होळीला याओसांग म्हणतात

पाच दिवस चालणाऱ्या या सणात सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात

गोवा  शिगमो उत्सव

गोवा मध्ये शिगमो नावाने होळी साजरी केली जाते

रंगीत मिरवणुका आणि लोकनृत्य हे या उत्सवाचे आकर्षण आहे

महाराष्ट्र   रंगपंचमी

धुळवडीनंतर रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते

पाणी आणि गुलालासोबत आनंदात सण साजरा होतो