तुम्हाला माहित आहे का अभ्यंगस्नानाची योग्य पद्धत? 

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा  आहे

अभ्यंगस्नान करण्यासाठी विशेष ठराविक वेळ आणि पद्धत असते

अभ्यंगस्नान पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान केले जाते

अभ्यंगस्नान करताना तेल आणि उटणे लावले जाते

अभ्यंगस्नान करताना पहिले संपूर्ण अंगाला तेल लावून घेणे

तेल लावण्याची सुरुवात डोक्यापासून करावी आणि शेवट पायाशी करावा

तेल लावल्यानंतर किमान २५ मिनिटांनंतर स्नान करावे

स्नान करतानासुद्धा डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने उटणे लावावे

यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करावी 

या पद्धतीने अभ्यंगस्नान केल्यास शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होते