उन्हाळ्यात मुलांना चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ;  आरोग्यावर होईल परिणाम!

जास्त आईस्क्रीम: जास्त आईस्क्रीममुळे घसा दुखणे आणि सर्दीचा त्रास वाढू शकतो

कोल्ड ड्रिंक्स: साखर, गॅस जास्त असल्याने शरीर डिहायड्रेट होतं.

जंक फूड: पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज यामुळे पोटाचे त्रास आणि आळस वाढतो.

जास्त चॉकलेट: उन्हाळ्यात चॉकलेट जास्त खाल्ल्याने उष्णता आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.

पॅकेज्ड ज्यूस: हे हेल्दी वाटले तरी त्यात प्रिझर्वेटिव्ह आणि अतिरिक्त साखर असते.

मसालेदार पदार्थ: अशा पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढू शकते.

रस्त्यावरची कापलेली फळं: उन्हामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो.

बेकरी पदार्थ: केक, पेस्ट्री, क्रीमयुक्त पदार्थ मुलांच्या पचनावर परिणाम करू शकतात

इंस्टंट नूडल्स: यात पोषण कमी आणि मीठ जास्त असल्याने मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीत.

कॅफिनयुक्त पेय: कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स मुलांच्या झोपेवर आणि शरीरावर वाईट परिणाम करू शकतात

उन्हाळ्यात योग्य आहारच मुलांना फिट, फ्रेश आणि आजारांपासून दूर ठेवू शकतो.