अनेकांना रात्रीची राहिलेली चपाती सकाळी खाण्याची सवय असते, पण अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की तसे करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तर याचे उत्तर जाणून घेऊया.
ताज्या आणि गरम चपातीच्या तुलनेत, शिळ्या चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी असतो. जर तुम्ही ती नाश्त्यात दही, दूध किंवा मोड आलेल्या कडधान्यांसोबत खालली तर मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
रात्रीची उरलेली चपाती फेकून देण्याऐवजी, तुम्ही ती कोमट दुधासोबत देखील खाऊ शकता. बरेच लोक शिळ्या चपातीला तूप लावतात, भाजतात आणि नंतर खातात.हा एक जलद पौष्टिक नाश्ता आहे.
शिळी चपाती खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत देखील होते, आणि पोट देखील जास्त काळ भरलेले राहते.
शिळी चपाती म्हणजे एक दिवस उलटून गेलेली चपाती खावी असे नाही, बराच काळ साठवून ठेवलेली चपाती खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.