थंडीमध्ये अंजीर खाण्याचे फायदे

थंडीची चाहूल लागताच बाजारात फ्रेश अंजीर दिसू लागतात

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत

यामुळे सलग १५ दिवस अंजीर खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घ्या

अंजीरमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असल्याने रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते

अंजीरचे खाल्ल्याने शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो

कोरडी त्वचा, अ‍ॅलर्जी, एक्झिमा किंवा पिग्मेंटेशनची समस्या असल्यास अंजीर खाणे लाभदायक ठरते

यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होऊन त्वचा तरुण दिसते

अंजीरमधील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधेदुखीचा धोका कमी होतो

आयुर्वेदानुसार अंजीर हे पचनप्रक्रियेसाठी टॉनिक मानले जाते

बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी रात्री दुधामध्ये अंजीर उकळून ते प्यावे