महाराष्ट्रातील 'या' राष्ट्रीय उद्यानांना नक्की भेट द्या! 

तुम्ही जर वन्यजीवप्रेमी असाल तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांना भेट दिलीच पाहिजे

महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत

ही उद्यान महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये असून येथे दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे

ताडोबा राष्ट्रीय उद्यान(चंद्रपूर)

हे उद्यान विशेषत: वाघांसाठी ओळखले जाते

चांदोली राष्ट्रीय उद्यान (सांगली)

इथे बिबट्या, अस्वल, सांबर, भेकर, गवा, शेखरू यांसारख्या वन्यप्राण्यांचे दर्शन होते

पेंच राष्ट्रीय उद्यान  (मध्य प्रदेश राज्याची सीमा)

हे उद्यान 'द जंगल बुक' चे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते.

गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती)

हे उद्यानसुद्धा वाघांच्या अधिवासासाठी ओळखले जाते

नवेगाव राष्ट्रीय उद्यान (गोंदिया)

हे उद्यान वाघांसह पक्ष्यांच्या अधिवासासाठी ओळखले जाते

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई)

मुंबईतील मोक्याच्या जागी असलेल्या या उद्यानात दुर्मिळ पक्षी आहेत