ठरलं!
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नबेडीत अडकणार
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी लवकरच लग्नाचा बार उडणार असल्याचे दिसत आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे लग्न ठरले असल्याचे जाहीर केले आहे.
प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, ठरलं! असा खास कॅप्शन देत प्राजक्ताने तिचे लग्न ठरल्याचे सांगितले आहे
या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिचे खास फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोंंमध्ये प्राजक्ताने सुंदर साडी, दागिन्यांसह गळ्यात हारही घातला आहे.
तिच्यासोबत घरातील मंडळी आणि नातेवाईकही या फोटोंमध्ये दिसत आहेत. प्राजक्ताचा साखरपुडा झाला असून त्याच सोहळ्यातील हे फोटो आहेत अशी चर्चा आता रंगली आहे.
मात्र प्राजक्ताचा होणारा पती कोण? तो काय करतो? याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात एन्ट्री केली.
या मालिकेतील तिची येसूबाईंची भूमिका प्रचंड गाजली.
Click Here