Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणश्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ

श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ

निलेश राणे यांची ग्वाही

राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विकासासाठीचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत मंजूर झालेला विकास निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत निश्चितच प्रयत्न करू. मात्र तरीही जादा निधी लागल्यास आम्ही हा निधी निश्चितच उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही माजी खासदार निलेश राणे यांनी मिठगवाणे येथे श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या विश्वस्तांना दिली.

गुरुवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आलेले निलेश राणे यांनी श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या यात्रोत्सवाला हजेरी लावली. यावेळी यांनी श्री देव अंजनेश्वराचे दर्शन घेतले. यानंतर निलेश राणे यांचा विश्वस्त डॉ. मिलींद देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. देसाई यांनी मंदिराच्या एकूणच कामकाजाबाबत माहिती देताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात हे गाव बाधित आहे, मात्र या गावाच्या आणि मंदिराच्या विकासासाठी कंपनीकडून जो विकास निधी देण्यात येणार होता तो अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे मंदिर परिसरातील भौतिक सुविधा व अन्य कामे करता आली नसल्याचे यावेळी नमूद करत हा निधी लवकरात लवकर मिळावा अशी मागणी केली. त्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी निलेश राणे यांच्याकडे मागणी केली.

निलेश राणे यांनी आपण निश्चितच केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामार्फत प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. मात्र तरीही निधी कमी पडला, तर भाजपच्या विधान परिषद सदस्यांच्या निधीतून आम्ही निधी देऊ, आपण प्रस्ताव द्या, असे सांगितले.

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपचे ठाणे शहर युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर, युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा संघटन सरचिटणीस अक्षय तिवरामकर, भाजप महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष मुकुंद जोशी, दोनिवडेचे माजी सरपंच दीपक बेंद्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष जब्बार काझी, तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शीतल चव्हाण, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजन कुवेसकर आदींसह पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -