Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange : आम्ही आझाद मैदानात जाणारच, मनोज जरांगेंचा ठाम निर्धार

Manoj Jarange : आम्ही आझाद मैदानात जाणारच, मनोज जरांगेंचा ठाम निर्धार

लोणावळा : आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, असा ठाम पवित्रा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार? अशी चर्चा असतानाच त्यांनी आझाद मैदानात व्यासपीठ तयार असल्याचे सांगत त्याठिकाणीच आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

मनोज जरांगे यांनी सांगितले की, जनतेला त्रास नको, ते काम करत आहेत. मात्र आरक्षणावर मालकांनीच (मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री) तोडगा काढावा अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही तोडगा काढण्यास तयार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही

मालक आल्यास आम्ही चर्चा करु, पण ते नाही आल्यास चर्चा कशी करणार? सगेसोयऱ्यांचा आदेश काढला आहे का? असे सांगत त्यांनी मागण्यांवर सरकारकडून निर्णय झाला नसल्याचे सांगितले. आम्हाला परवानगी नाकारलेली नाही. कोर्टाची नोटीस आहे म्हणून सही केली. मात्र, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. आम्ही मुंबईला जाणारच आहोत. दगाफटका होऊ नये सावध राहिलेलं बरं. त्यामुळे कोणी उपद्रव केल्यास पोलिसांच्या ताब्यात द्या म्हणून सांगितलं असल्याचे त्यांनी सांगितले.

आझाद मैदानात तयारी सुरु

दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या २६ जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. “आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती. आम्ही स्टेज बांधण्याचे काम सुरु केले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करु” असे मराठा महासंघाचे नेते वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो

मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे यांनी म्हटले की, कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा, मनोज जरांगे यांनी घेतला आहे.

मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतला आहे, आम्ही मुंबईकडे जात आहोत, असे जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मनोज जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -