Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीWater Supply Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २ आणि ३ नोव्हेंबरला...

Water Supply Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २ आणि ३ नोव्हेंबरला ‘या’ भागात पाणी नाही

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी (Mumbai News) समोर आली आहे. पावसामुळे मुंबईकरांच्या वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आता एका वेगळ्या कारणामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने मुंबईतील काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर काही भागांत पाणीपुरवठा बंद (Water Supply Cut) ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई पालिकेच्या वतीने ९०० मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचं तसेच ३०० ते १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवारी २ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजल्यापासून शुक्रवारी ३ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील.

पाणीपुरवठा बंद असलेल्या विभागांतील रुग्णालयांनाही याचा त्रास होणार आहे. दक्षिण मुंबईतील काही रुग्णालयांमध्येही दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात केईएम, टाटा, जेरबाई, वाडिया, एमजीएम या रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबईतील मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी, सायन, माटुंगा, दादर, लालबाग, परळ या ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद असणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच मुबलक पाणीसाठा करुन ठेवावा व पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

मानखुर्द, चेंबूरमधील काही भागांत पाणीपुरवठा बंद

मुंबईतील एम/पूर्व विभागात अहिल्याबाई होळकर मार्ग, मंडाला, म्हाडा इमारती, कमलरामन नगर, आदर्श नगर, रमण मामा नगर, जनता टिंबर मार्ट परिसर, लोटस कॉलनी, अब्दुल हमीद मार्ग, जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, पांजारापोळ भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर एम / पश्चिम विभागात वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, लालडोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर, श्यामजीवी नगर, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी रस्ता, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

घाटकोपरमध्ये पाणीपुरवठा बंद

एन विभागात घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, गरोडिया नगर, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर, गुरुनानक नगर, जवाहर मार्ग, गौरीशंकर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, गिगावडी, भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) श्रेयस सिग्नल इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, काम गल्ली, श्रद्धानंद रस्ता, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर शेजारील परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी परिसरात पाणीपुरवठा बंद

एल विभागात नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), केदारनाथ मंदीर मार्ग, नवरे बाग, कामगार नगर, पोलीस वसाहत, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

सायन, माटुंगा, दादरमध्ये पाणीपुरवठा बंद

एफ/उत्तर विभागात शीव पश्चिम आणि पूर्व, दादर (पूर्व), माटुंगा (पूर्व), वडाळा, चुनाभट्टीचा भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, लोढा इमारती (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा भागांत पाणीपुरवठा बंद.

लालबाग, परळ भागांत पाणीपुरवठा बंद

एफ/दक्षिण विभागात शिवडी, लालबाग, परळ गाव, परळ, काळेवाडी, नायगाव, कॉटन ग्रीन, मिंट कॉलनी, दत्ताराम लाड मार्ग, अभ्युदय नगर भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -