Monday, May 13, 2024
Homeमहत्वाची बातमीWater Shortage : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक

Water Shortage : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणांतील पाणीपातळी चिंताजनक

मुंबई : राज्यात यावर्षी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २०.२५ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट (Water Shortage) झाली आहे. सध्या राज्यातील तीन हजार धरणांतील पाणीसाठा ७६.२० टक्के इतकाच शिल्लक आहे. यामुळे उन्हाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.

पुणे शहरातही पाण्याची परिस्थिती भविष्यात गंभीर होणार असून मोठा प्रश्न उद्भवणार आहे. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी या संदर्भात पत्र लिहून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते. राज्यात २ हजार ९९४ लहान-मोठी धरणे असून त्यातील पाणीसाठा दररोज कमी होत आहे.

मुंबईतील धरणांमधील पाणीसाठा

भातसा

गेल्या वर्षी – 82.81

या वर्षी – 77.80

मोडक सागर

गेल्या वर्षी 76.23

या वर्षी 68.05

तानसा

गेल्या वर्षी 84.99

या वर्षी 79.79

मध्य वैतरणा

गेल्या वर्षी 49.57

या वर्षी 47.37

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा

नागपूर

गेल्या वर्षी 81.01

या वर्षी 70.17

अमरावती

गेल्या वर्षी 86.65

या वर्षी 72.36

संभाजीनगर

गेल्या वर्षी 90.73

या वर्षी 43.42

नाशिक

गेल्या वर्षी 97.21

या वर्षी 73.79

पुणे

गेल्या वर्षी 87.11

या वर्षी 81.17

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -