Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकMaharashtra Politics : थोडं थांबा, राष्ट्रवादी एकसंघ आहे की फाटाफूट लवकरच कळेल

Maharashtra Politics : थोडं थांबा, राष्ट्रवादी एकसंघ आहे की फाटाफूट लवकरच कळेल

गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट!

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट सत्तारूढ सेना-भाजपा बरोबर आहे. तर काँग्रेस-ठाकरे गटासोबत शरद पवार (Sharad Pawar) आहेत. एकीकडे राष्ट्रवादीत फूट आहे अशी चर्चा असताना दुसरीकडे मात्र सध्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे हे संमतीचे राजकारण (Maharashtra Politics) सुरू आहे का, याबाबत संभ्रम आहे. त्यावर भाष्य करताना भाजपाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी थोडं थांबा, राष्ट्रवादी एकसंघ आहे की फाटाफूट लवकरच कळेल आणि हा संभ्रमही लवकरच दूर होईल, असे म्हटल्याने राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

जयंत पाटील यांच्या भाजपाच्या पक्षप्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. अजितदादा पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे भाजपा बरोबर येतील असे वाटले होते का, असा उलट प्रश्न त्यांनी केला.

सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खाते वाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणतं खातं द्यायचं हे नेते ठरवतील आणि सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री पद बदलाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र महाजन यांनी पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -