Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीस्वच्छ भारत अभियानाला वाहनांचा अडथळा

स्वच्छ भारत अभियानाला वाहनांचा अडथळा

नवी मुंबई : स्वच्छ भारत या केंद्र शासनाच्या अभियानात देशस्तरावर आजतागायत नवी मुंबई महानगपालिकेचा झेंडा फडकताना नेहमीच दिसून आला आहे. या यशात इतर विविध विभागांपैकी घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील तितकाच त्याग आहे. परंतु हे दैनंदिन स्वच्छता कर्मचारी भल्या पहाटे नगरीतील रस्ते, मोकळ्या जागा साफ व स्वच्छता करण्याकरिता येत असले तरी रस्त्या लगत नियमबाह्यपणे उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छतेला अडथळा ठरत आहेत. यामुळे साहजिकच रस्ते स्वच्छ करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

स्वच्छता अभियान पाच वर्षांपूर्वी म्हणजेच केंद्र शासनाकडून २०१६ पासून घोषित केले. या पाचही वर्षांत मनपाला विविध मानांकन प्राप्त झाली आहेत. यावर्षी तर दहा ते चाळीस लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरासाठी असणाऱ्या मानांकनात देशात पहिल्या क्रमांकावर मोहर उमटवली आहे. तर कायमच राज्यात एक क्रमांकावर मनपा राहिली आहे. राज्यात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच अव्वल राहिली असल्याचा इतिहास आहे. यामध्ये देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा त्याग आहे. हे सर्व घडत असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांना काहीना काही कारणामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वाहनांची भाऊगर्दी…

नवी मुंबईत वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. त्यातच अनाधिकृत बांधकामामुळे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. यामुळे नोडल किंवा गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टी परिसरातील रस्त्याशेजारी वाहनांची भाऊगर्दी नेहमीच दिसून येत आहे. यावर अतिक्रमण विभागाने कणखर कारवाई करण्याची गरज अत्यावश्यक आहे.

….तर वाहन पार्किंगची समस्या कमी होईल – सुबिन थॉमस, जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस, नवी मुंबई

नवी मुंबईत नाले आहेत. ज्याप्रमाणे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका शेजारी असणाऱ्या नाल्यावर स्लॅब टाकून वाहन पार्किंग केली. त्या प्रकारे घणसोली, पावणे, कोपरखैरणे, शिरवणे, जुईनगर तसेच इतर नाल्यावर स्लॅब टाकला, तर वाहन पार्किंगची समस्या काही प्रमाणात कमी होईल. याचा विचार अभियांत्रिकी प्रशासनाने युद्ध पातळीवर करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -