Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीVanchit and UBT : वंचितचा मतदार हवाय पण उमेदवार नको, म्हणून पडणाऱ्या...

Vanchit and UBT : वंचितचा मतदार हवाय पण उमेदवार नको, म्हणून पडणाऱ्या जागा दिल्या!

आरोप करत वंचितने नाकारल्या ठाकरे गटाने दिलेल्या जागा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. मात्र, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले होते. तर मविआने जो चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, तो वंचितला मान्य नसल्याचे समोर आले आहे.

वंचित आघाडीला चार जागा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे संजय राऊत म्हणत होते. या चार जागांमध्ये अकोल्याच्या जागेसह अन्य तीन जागा आहेत. मात्र, यामध्ये दोन जागा वंचितकडून नाकारण्यात आल्या आहेत. वंचितच्या कार्यकारिणीची काल पुण्यात बैठक झाली. वंचितचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दोन जागा नाकारल्याची घोषणा केली. राज्य कार्यकारिणीने एकमताने हा प्रस्ताव फेटळाल्याचे ते म्हणाले.

सिद्धार्थ मोकळे म्हणाले, आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तरी आम्हाला हरण्याची शक्यता जास्त असलेल्या दोन जागा देण्यात आल्या. या जागा आम्हाला नको, असं ते म्हणाले. मविआच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका झाल्या, त्यापैकी एकाही बैठकीला आम्हाला बोलविण्यात आले नाही. मार्चमध्येही बैठका झाल्या, अद्याप आमच्याशी मविआच्या कोणत्याही पक्षाने संवाद साधलेला नाही, असंही सिद्धार्थ मोकळे म्हणाले.

आम्ही काही फक्त तुमच्या जागा निवडून देण्यासाठी नाही आहोत. मविआला आमची गरज आहे. वंचितचा मतदार त्यांना हवाय पण वंचितचा उमेदवार नको. म्हणून पडणाऱ्या जागा द्यायच्या हे धोरण योग्य नाही, अशी टीका मोकळे यांनी केली. तसेच सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -