Friday, May 17, 2024
HomeदेशUttarkashi tunnel collapsed : बचाव यंत्रणा करतायत काय? ते ४१ मजूर अजूनही...

Uttarkashi tunnel collapsed : बचाव यंत्रणा करतायत काय? ते ४१ मजूर अजूनही बोगद्यातच!

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) उत्तरकाशीतील निर्माणाधीन सिल्क्यरा बोगदा कोसळल्याने (Uttarkashi tunnel collapsed) दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १२ नोव्हेंबरपासून ४१ मजूर आत अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले असले तरी आज तेराव्या दिवशीही या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही. हे मजूर कालच्या दिवशीच बाहेर निघतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, अजूनही त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.

सुरुवातीला ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याने बोगदा खोदण्यासाठी खास अमेरिकन तंत्रज्ञानाने बनवलेली ऑगर मशीन मागवण्यात आली होती. मात्र, बचावकार्यादरम्यान काल या मशीनमध्येही बिघाड झाला. तिच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे गेले १६ तास खोदकाम थांबले आहे. देशविदेशांमधून तज्ज्ञही या बचावकार्यासाठी बोलावण्यात आले मात्र त्याने काही फरक पडला नसल्याचे चित्र आहे. कामगार आतमध्ये सुखरुप श्वास घेत असले तरी त्यांना कराव्या लागत असलेल्या अडीअडचणींचा सामना लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे.

दरम्यान, आता बचावकार्यावेळी बोगद्याच्या आतमध्ये ड्रोन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, जेणेकरून बोगद्याच्या आतमध्ये बचाव कार्यादरम्यान कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याचा आधीच अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी बोगद्यात अडकलेल्या मजुरांशी सतत चर्चा करण्यात येत असून त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तू पोहोचवल्या जात आहेत. बचावकार्य अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी कामगारांमची यातून केव्हा सुटका होईल, हा मोठा प्रश्न आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -