Saturday, May 4, 2024
Homeदेशउत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे गुळगुळीत करणार, त्यासाठी ५ लाख कोटी खर्च करणार

उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेसारखे गुळगुळीत करणार, त्यासाठी ५ लाख कोटी खर्च करणार

निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मोठ मोठ्या घोषणा

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यूपीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. २०२२ मध्ये यूपीत विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यूपीत मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधील रस्ते हे अमेरिकेसारखे करणार असून यासाठी ५ लाख कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केंद्र सरकारची असल्याची माहिती त्यांनी दिली. मिर्झापूर मधील राष्ट्रीय महामार्ग योजनेच्या उद्धाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी यांनी यूपीच्या जौनपूर आणि मिर्झापूरला जोडणाऱ्या २३२ किलोमीटर लांब हायवेची पायाभरणी केली. या हायवेला ४ हजार १६० कोटी रुपये खर्च करून बांधले जात आहे. राज्यातील विकास करण्यासाठी रस्ते योजना महत्वपूर्ण आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा एक्सप्रेसवेची पायाभरणी केली होती. ५९४ किलोमीटरपर्यंत रोड असून यासाठी ३६,२०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पीएम मोदी यांनी पूर्वांचल एक्सप्रेसवेचेही उद्धाटनही केले होते. यूपीची राजधानी लखनऊ ते बिहारच्या सीमावर्ती क्षेत्रात अनेक पूर्वी जिल्ह्यात प्रवास करताना वेळ वाचणार आहे.

नितीन गडकरी यांनी राज्यसभेत म्हटले की, देशात नोव्हेंबर २०२१ पर्यंत राष्ट्रीय महामार्गची लांबी १, ४०, ९३७ किमी आहे. भारतात राष्ट्रीय महामार्गची एकूण लांबी एप्रिल २०१४ पासून जवळपास ९१, २८७ किमी वाढून यावर्षी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जवळपास १, ४०,९३७ किमी झाली आहे. आकडेवारी शेअर करताना गडकरी यांनी २०१४-१५ पासून यावर्षीच्या नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत जवळपास ८२,०५८ किमीचे राष्ट्रीय महामार्ग योजनेचे उद्धाटन करण्यात आले आहे, असे सांगितले. या दरम्यान ६८ हजार ६८ किमीच्या लांब रस्त्याचे निर्माण करण्यात आल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -