Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : उद्धव ठाकरे सत्तेसाठी आणि जिहाद्यांच्या मतांसाठी लाचार

Nitesh Rane : उद्धव ठाकरे सत्तेसाठी आणि जिहाद्यांच्या मतांसाठी लाचार

गरबा आणि दांडियामध्ये केवळ खर्‍या हिंदू व्यक्तीलाच प्रवेश

आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य

मुंबई : काल काँग्रेसच्या (Congress) सीडब्ल्यूसी मीटिंगमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनाची भूमिका घेण्यात आली. खुलं समर्थन देऊन काँग्रेस अप्रत्यक्षपणे दहशतवादाचा हैदोस घालत आहे. निरपराध माणसांना मारणारे जे दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस खुल्या मनाने रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेसच्या कालावधीत जे जे दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टींना काँग्रेसचा अप्रत्यक्ष कसा पाठिंबा आहे आणि काँग्रेसची मानसिकता कशी आहे, याचं प्रदर्शन यातून झालं आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सनातन धर्माचा अपमान करणार्‍या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. तसेच हिंदू सणांमध्ये (Hindu Festivals) व्यत्यय आणून लव्ह जिहाद (Love Jihad) करणार्‍यांनाही धारेवर धरले आहे.

नितेश राणे म्हणाले, सनातन धर्माला शिव्या घालणार्‍या लोकांसोबत काँग्रेस बसते तरी उद्धव ठाकरे तोंडातून एक चकार शब्द बाहेर काढत नाहीत. तेव्हा ते मौनी बाबासारखे बसून राहिले. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असून ना त्यांनी डीएमकेला (DMK) धमकावलं, ना त्यांनी इंडिया अलायन्समधून (INDIA Alliance) बाहेर पडण्याची हिंमत दाखवली. त्यांनी तेव्हाही भूमिका घेतली नाही आणि आताही जेव्हा काँग्रेसने दहशतवादाला खुला पाठिंबा दिला आहे तेव्हा सत्तेसाठी लाचार, जिहाद्यांच्या मतांसाठी लाचार असलेल्या उद्धव ठाकरेंनी काहीही भूमिका घेतलेली नाही, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.

आज सकाळी उद्धव ठाकरे यांचा नालायक कामगार संजय राजाराम राऊत मोठं स्पष्टीकरण देत होता, इतिहास सांगत होता. पण काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करणारे हे लोक दाखवून देत आहेत की त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा नैतिक अधिकार का नाही. सनातन धर्माच्या अपमानाविषयी एक शब्द न बोलणे अशा कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांच्या चौकटीत बसणार्‍या नाहीत. त्यामुळे यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावण्याचा अधिकार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे

बाळासाहेबांनी अशा गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या. त्यांच्या हयातीत आज सकाळच्या सामना वृत्तपत्रात त्यांनी दहशतवाद्यांना अशा शब्दांत ठणकावलं असतं की इथून ते इस्राईलपर्यंत ते थरथर कापले असते. पण ज्याचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे, जो मतांसाठी प्रचंड वेडा झाला आहे तो उद्धव ठाकरे ही हिंमत कधीच करणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

राहुल गांधींनी तोंडाला टाळं मारावं

आम्ही वारंवार सांगत आहोत की राहुल गांधींमध्ये नेतृत्वाचे गुण नाहीत, याच्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कालच्या एका भाषणात शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी हे चांगले वक्ते नाहीत, असं ते म्हणाले. म्हणजेच काय तर राहुल गांधी स्टेजवर उभे राहून भाषण करु शकत नाहीत, विचार देऊ शकत नाहीत. त्यांचाच नेता अगर म्हणत असेल की माझ्या नेत्याला बोलता येत नाही, तर राहुल गांधींनी आता घरी बसावं आणि तोंडाला टाळं मारावं.

गरबा आणि दांडियामध्ये खर्‍या हिंदू व्यक्तीलाच प्रवेश द्यावा

सकल हिंदू समाजाने इच्छा व्यक्त केली आहे की यंदा नवरात्रीनिमित्त जे गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाणार आहे, त्यात येणारे लोक हिंदूच असले पाहिजेत. कारण याच काळात लव्ह जिहादचे अनेक प्रकार होतात. त्यामुळे आयोजकांनी गेटवरच आधारकार्ड तपासून खर्‍या हिंदू व्यक्तीलाच प्रवेश द्यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. जेणेकरुन हिंदूंचा सण साजरा करत असताना कोणी आमच्या माताभगिनींकडे वाकडया नजरेने पाहणार नाही.

अन्य धर्मीयांना दांडिया खेळण्याची काय गरज?

अन्य धर्मांमध्ये देवीची पूजा केली जात नाही मग अन्य धर्मीयांना दांडिया खेळण्याची काय गरज? आणि तरीही त्यांना यात सहभागी व्हायचंच असेल तर आमच्या अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत ज्या त्यांची घरवापसी करण्यासाठी मदत करतील. सर्वजण हे आधी हिंदूच होते, त्यामुळे त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी आम्ही मदत करु, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -