Thursday, May 16, 2024
Homeताज्या घडामोडीNilesh Rane : उबाठा सेनेला भगदाड!

Nilesh Rane : उबाठा सेनेला भगदाड!

माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर यांचा भाजपात प्रवेश

माजी खासदार निलेश राणे यांनी केले भाजपात स्वागत

कुडाळ : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ते स्वगृही परतले आहेत. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर हे आमच्या राणे कुटुंबीयांचा एक भाग होते काही काळ ते आमच्यापासून विभक्त झाले होते पण ते आमचे आहेत आमचे राहणार आहेत त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात केला जाईल असे सांगितले. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू धुरी यांनी भाजपा नेते निलेश राणे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर व विष्णू धुरी यांचे भाजप पक्षात स्वागत केले.

या प्रवेशामुळे पिंगुळीसह पंचक्रोशीतील गावांमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पडले आहे.

यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, विकास कुडाळकर तुम्ही परत आमच्या कुटुंबात आलात तुमचे स्वागत आहे. गेल्या अडीच वर्षात तुम्ही तिकडे कोरोना कालावधित गेलात. आमच्या कुटुंबातील घटक गेल्याने त्यावेळी आम्हाला धक्का बसला. मात्र आता तुमचे स्वागत आहे. तुम्हाला अभिप्रेत असणारा पिंगुळी गावाचा सर्वांगीण विकास आम्ही करणार आहोत. तुमचा पक्षात मान सन्मान निश्चितच होणार आहे. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वागीण विकास हा आमचे नेते नारायण राणे यांच्या माध्यमातून झाला आहे आणि आजही होत आहे. येथील स्थानिक आमदारांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाला दहा वर्षे मागे नेले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. राणेंच्या कारकिर्दीतील टाळंबा प्रकल्प, सी वर्ल्ड, अशा प्रकल्पना पुढे दिशा मिळाली नाही एमआयडीसी ओसाड झाली आहे एकूणच या मतदासंघाच्या सर्वागीण विकासासाठी व रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे त्याअगोदर होणाऱ्या जिल्हा परिषदेवर गेली २५ वर्षे आमचे नेते नारायण राणेंच्या विचारांचा असणारा झेंडा सुध्दा यावेळी फडकावयाचा आहे.

पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तीचे सावट असताना येथील आमदार वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसात मश्गूल होते अशा निष्क्रीय आमदाराला आता मतदारच २०२४ ला कायमची जागा दाखविणार आहेत. गेल्या नऊ वर्षांत त्यांचे आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी गाजलेले एकतरी भाषण दाखवा विधानसभेत तीस सेकंदापेक्षा जास्त न बोलणारा आमदार विकास काय करणार? असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी आज पिंगुळी कार्यकर्ता मेळाव्यात करत ज्यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्याचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारासुद्धा त्यांनी दिला. माझी दिशा चुकली होती

प्रवेशकर्ते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर म्हणाले, मी कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केलेला नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मला बरीच पदे दिली. त्यांच्यामुळे मी मोठा झालो माझ्याकडुन दिशा चुकली ती सुधारण्याची संधी मला पुन्हा कुटुंबात घेऊन दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे यापुढे आपल्याला अभिप्रेत असणारे काम करेन.

२०२४ चा आमदार निलेश राणेच दत्ता सामंत

या मतदासंघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना आमदार करणे हे आपले सर्वाचे काम आहे राज्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागूया या मतदासंघात भाजप पक्षाचे उमेदवार हे निलेश राणेच असणार आहेत माझ्यासह रणजित देसाई अन्य कोणीही निवडणूक लढविणार नसल्याचे दत्ता सामंत यांनी सांगून अनेक जुने कार्यकर्ते जे आमच्यापासून लांब गेले आहेत त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचे प्रवेश भाजपमध्ये करून घेणार असेही त्यांनी सांगितले. सरपंच अजय आकेरकर, संजय वेंगुर्लेकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मंगेश मस्के यांनी केले. प्रास्तविक दत्ता पाटील यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -